‘किरीट सोमय्यांना तिकिट देऊ नका’; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

kirit somaya

काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सोमय्या यांची तक्रार केली आहे. त्यामुळे भाजपचे खासदार किरीट सोमय्या समोरच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.  राज्यात भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते एक झाले पण ईशान्य मुंबईत युतीत मीठाचा खडा टाकणाऱ्या किरीट सोमय्यांना तिकिट देऊ नका, अशी मागणीच शिवसैनिकांनी केली आहे.

शिवसैनिकांच्या आक्रमक विरोधामुळे भाजपकडून ईशान्य मुंबईची उमेदवारी अजुनही घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतायत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली खरी. पण मुंबईत एका जागेच्या उमेदवारावरुन शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. ईशान्य मुंबई मतदारसंघातले शिवसैनिक भाजपशी युती करण्याच्या विरोधात आहेत. खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका केली होती.