1993 Blast- अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी

1993 blast abu salem

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने केली आहे. सालेमच्या शिक्षेवर मुंबईतील टाडा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सालेमला फाशी देण्याची मागणी बॉम्बस्फोटात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. मात्र, सालेमला पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून भारतात आणलं असल्यानं, त्याला फाशीची शिक्षा देता येणार नसल्याचं, अन्वेषण विभागाचं म्हणणं आहे.