राहुल फटांगळे खून केसमध्ये अॅड उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी

maratha kranti morcha

पुणे: मराठा क्रांती मोर्चा कडून १० जानेवारीला महाराष्ट्र बंद अशी अफवा सोशल मिडियावर फिरत होती. मात्र हि अफवा खोटी असून १० तारखेला राहुल फटांगळेचा दहावा असल्यामुळे सकाळी ८ वाजता शोकसभा घेतली जाईल अस मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Loading...

मराठा क्रांती मोर्चा आणि राहुल फटांगळेचा भाऊन तेजस धावडेनं यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल फटांगळे याच्या खून खटला आणि हिंसाचार,तोडफोडीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई केसमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी राहुलचा मावसभाऊ तेजस धावडे याने केली आहे. राहुल फटांगळे याचा दहावा विधी कान्हूर मसाई या गावी सकाळी ८ वाजता होणार आहे. फक्त सकाळी ८ वाजता शोकसभा होणार आहे अशी माहितीही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली.Loading…


Loading…

Loading...