महापालिकेचे शिष्टमंडळ जाणार परदेश वारीला

पुणे : स्मार्ट सिटी मिशन अंर्तगत शहर विकासावर चर्चा आणि अभ्यास करण्यासाठी महापालिकेचे एक शिष्टमंडळ इंग्लंड दौरा करणार असून या शिष्टमंडळात पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांचा समावेश राहणार आहे. शिष्टमंडळाच्या परदेशी वारीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

bagdure

स्मार्ट सिटीअतंर्गत शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने भागीदारी करण्याविषयीच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड भेटी दरम्यान केली होती. त्यानुसार ब्रिटिश हाय कमिशनने पत्र पाठविले आहे. इंग्लंड येथे ८ ते १४ जानेवारी या कालवधीत शहर विकासाबाबत चर्चा आयोजित केली आहे. या अभ्यास दौ-यासाठी पुणे महापालिकेचे शिष्टमंडळ जाणार आहे. अभ्यास दौ-यासाठी पुणे ते मुंबईपर्यतचा प्रवासाचा खर्च पुणे महापालिकेला करावा लागणार आहे. उर्वरित सर्व खर्च इंग्लंड सरकार करणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शिष्टमंडळात स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे, अधिक्षक अभियंता अनिरुध्द पावसकर, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर बार्शीकर याचा समावेश आहे.

Comments
Loading...