युतीचा निर्णय पार्लमेंटरी समितीच घेणार – श्याम जाजू

टीम महाराष्ट देशा : महाराष्ट्रात शिवसेनेला युतीत घेण्याचा निर्णय पार्लमेंटरी समिती घेणार असून लवकरच युतीबाबत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिली आणि प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशा त्यांनी भाष्य केले.

प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला काहीही नुकसान होणार नाही तर मोदींना रोखण्यासाठी आणि सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांना जनता त्यांची जागा नक्कीच दाखवेल असा टोला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी लगावला.

वसंत स्मृती कार्यालयात जाजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपा लवकरच ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’, हे अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि 12 फेब्रुवारीपासून ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या अभियानाची देशात सुरुवात होणार असून अमित शहा हे गुजरातमध्ये हे अभियान सुरु करतील अशी माहिती दिली या अभियानासाठी विशेष समिती बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.