दहीहंडी , गणेशोत्सवामध्ये आता शुकशुकाट ? वाचा काय आहे कारण

पुणे : दहीहंडी , गणेशोत्सव म्हटल की आवाज आणि साउंड सिस्टीम चा वाद हा दरवर्षीचा झाला आहे. पण यंदा मात्र या वादाने नवीन वळण घेतले आहे. या वर्षी दहीहंडी, गणेशोत्सव या सणांना मात्र साऊंड सिस्टीम देणार नसल्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांनी घेतला आहे. न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा आणि ती उलटल्यास होणारी कारवाई, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता या साऊंड सिस्टीम मालकांनी पुकारलेल्या संपला दहीहंडी संघटनेने सुधा पाठींबा दिला आहे. जर या जाचक अटि मागे नाही घेतल्या तर यंदा दहीहंडी न फोडून निषेध व्यक्त करण्याचा इशारा दहीहंडी संघटनेने दिला आहे.
डॉल्बीच्या दणदणाटामुळे दरवर्षीच साऊंड सिस्टीम आणि आवाजाच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. शिवाय डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालकांना कारवाईला सामोरं जावं लागतं. या सर्व प्रकारामुळे साऊंड सिस्टीम मालकांनी यंदा दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम न देण्याचा इशारा दिला आहे.
आज ( ११ ऑगस्ट ) पासून पुण्यातील साउंड सिस्टम मालकांनी बंद पुकारल्यामुळे पुण्यातील सगळे कार्यक्रम विना साउंड सिस्टम सुरु आहेत. यावरून दहीहंडी आणि गणेशोत्सव सुधा विना साउंड सिस्टम होणार असच दिसत आहे.
बहुतेक साउंड सिस्टम मालकांनी १२ बेस पर्यंत साउंड सिस्टम विकत घेतले आहेत अशात सरकार ने घातलेल्या या जाचक अटींमुळे या मालकांचे नुकसानच होणार आहे. नेहमी आवाज जास्त झाल्यास साउंड सिस्टम चे नुकसान प्रशासनाकडून करण्यात येते. त्यामुळे हा संप पुकारला आहे.
निशांत खैरनार , साउंड इंजिनिअर