प्लास्टिक विक्रीवर बंदीच्या निषेधार्थ विक्रेत्यांचा दुकान बेमुदत बंदचा निर्णय

औरंगाबाद: राज्यात २३ मार्च रोजी जारी झालेल्या प्लास्टिक बंदीची निषेध करत संतापलेल्या विक्रेत्यांनी आपली दुकाने आज बंद ठेवली आणि प्रत्येक दुकानावर बेमुदत बंदचे फलक लावण्यात आले.

‘डोकं फिरल या सरकारचे प्लास्टिक बंदी निर्णयाचा निषेध करत ‘बेमुदत बंद’ असे फलकावर लिहिण्यात आले. सुमारे ३०० फेरीवाले प्लास्टिक विकतात व ५० लहान-मोठे प्लास्टिकचे होलसेलर असुन जवळपास १५ लाखाची उलाढाल होते. २००६ च्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या करिबॅग विक्रीवर बंद आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत. मात्र, संपूर्ण प्लास्टिक बंदी हे योग्य नाही. यामुळे १८०० परिवार बेरोजगार होतील. व इतर व्यवसायावरही याचा मोठा परिणाम पडणार आहे. असे प्लास्टिक शॉप असोसिएशनचे सचिव शेख नाजीम यांनी महिती देताना सांगितले .यावेळी सर्व प्लास्टिक होलसेलर हजर होते.