नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. त्यानंतर देशभरातून अनेक ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्यात आला. ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकावरून आंदोलन सुरू असताना पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.

मोदी म्हणाले, ” कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केलं जात होतं, ते आता काँग्रेस करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचं काम केलं आहे. त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता, हे सिद्ध झाले आहे.”

Loading...

त्यानंतर ते म्हणाले की, ‘ काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने नागरिकत्व कायद्यावरून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसने विनाकारण आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच आग लावणारे कोण आहेत? हे त्यांच्या कपड्यांवरूनच माहीत पडतं. आता यांच्याकडून देशाच्या हिताची कोणतीही आशा राहिलेली नाही. हे लोक केवळ त्यांच्या कुटुंबाचाच विचार करण्यात गुंग असतात, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जाळपोळ करणाऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या पाठींबा देत आहेत. मात्र देश हे सर्व पाहत आहे. त्यामुळे संसदेने नागरिकत्व कायदा बनवून देशाला वाचवल्याचा लोकांचा पक्का समज झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार