वैजापूरच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये

औरंगाबाद : वैजापूरच्यायक्षपदावरुन सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे पद सर्वसाधारण महिलेसाठी ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने (औरंगाबाद खंडपीठ) दिल्यानंतर त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी देण्यात आला. ऑक्टोबरमध्ये मुंबई येथे झालेल्या राज्यातील नगराध्यपदाच्या सोडतीत वैजापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने यात बदल करून नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी करण्याचा निर्णय घेतला व तशी नोंद निवडणूक विभागाच्या राजपत्रात करण्यात आली. वैजापूरचे नगराध्यक्षपद हे गेल्या पाच वर्षांपासून महिलेच्या ताब्यात असल्याने शासनाने यात बदल करून सर्वसाधारण गटाला नगराध्यक्षपदाची संधी दिली होती, परंतु शासनाच्या या निर्णयाला तत्कालीन नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी औरंडाबाद खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने सोडतीत जाहीर झालेला सर्वसाधारण महिलेचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे  नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. या निर्णयाला रवी पगारे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून आतापर्यंत या याचिकेवर अनेक सुनावण्या झाल्या आहेत. नगरपालिका निवडणूक लांबली नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी की फक्त सर्वसाधारण गटासाठी याबाबतच्या निर्णयायासाठी अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल. परिणामी नगरपालिकेची निवडणूकही आणखी लांबणीवर पडली आहे.

You might also like
Comments
Loading...