पाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे 

शिक्षकांची पदे भरली जात नाहीत  तो  पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

सोपान रोडगे/परतूर- परतूर तालूक्यात एक नाही दोन नाही चक्क पाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे. एका बाजूला शासन मोठ्या प्रमाणात  करताना जाहीरातबाजीवर खर्च करताना दिसते आणि दुसऱ्या  बाजूला ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नाहीत म्हणजे शासन नूसतेच जाहीरात बाजीवर खर्च करते का असा प्रश्न आता ग्रामीण भागातील नागरीकांना पडत आहे

परतूर तालुक्यात  जिल्हा परिषदच्या प्राथमिक 136 शाळा आहेत आणि माध्यमिक शाळा केवळ 3 च आहेत तर विद्यार्थी सख्या 16852 एवढी मोठी असून शिक्षक मात्र 196 च आहेत शासन नियमानुसार 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असायला हवा  परंतु परतूर तालुक्यात चित्र काही उलट आहे त्यामुळे शासन नियमांची  अंबलबजावनी होत नसल्याचे परतूर तालुक्यातील शाळांमध्ये दिसत आहे

        गेल्या दोन वर्षांपासून  गावाला शाळेवर शिक्षक मंजूर झालेले  आहेत परंतु शिक्षक शाळेवर रूजू होण्यासाठी गोळेगांव. आनंदराव. वैजोडा असे अनेक परतूर तालुक्यातील गावे हे शाळेला शिक्षक मिळावेत म्हनून संघर्ष करत आहेत . वैजोडा गावात गावकर्‍यांनी  बारावी शिक्षण घेतलेल्या मूलाला शिक्षक बनवले म्हणजे इतकी दैनिय  अवस्था शिक्षणाची असून गावकरी जो पर्यंत शाळेला मंजूर शिक्षकांची पदे भरली जात नाहीत  तो  पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी गटशिक्षण अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं नाही व टाळाटाळ करत फोन बंद करून ठेवला आहे.