केसांबरोबर आता खिशावर देखील चालणार कात्री, सलून व्यावसाईकांचा दरवाढीचा निर्णय

salon

पुणे – देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका अनेक छोट्या व्यावसायिकांना बसत असल्याचे चित्र आहे. सलून, पार्लर व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका भरून काढण्यासाठी अपरिहार्यता म्हणून आता दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता सलूनमध्ये अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. सलून सुरु होण्यापूर्वीच दरात 20 ते 40 टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे केसांच्या बरोबर आता खिशावर देखील कात्री चालणार असल्याची चर्चा आहे.

सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी खुर्च्या कमी करुन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणे, मास्क सॅनिटायजरचा वापर करणे, पीपीई किटचा वापर करणे, अशा प्रकारचा खर्च वाढणार आहे. तर काही ठिकाणी काम करणारे लोक सुद्धा कमी करावे लागणार आहेत. त्यामुळेच ही दरवाढ करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाॅकडाऊन पूर्वी केस कटिंगसाठी 60 ते 80 रुपये दर होता. तो आता 100 ते 120 रुपये करण्यात आला आहे. तर दाढी पूर्वी 40 ते 50 रुपयांमध्ये व्हायची. आता त्यासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. एसी सलूनमध्ये हे दर आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देश कोरोनाच्या विळख्यात मात्र अमित शहा लागले बिहार निवडणुकीच्या तयारीला…

पुण्यातील गुलटेकडी मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला आजपासून सुरू

शेतकऱ्यांना जेरीस आणणारी टोळधाड म्हणजे नक्की काय ?