कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासांत मागे

kolhapur

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत होत. अखेर २ मे रोजी निवडणूक पार पडली असून आज मतमोजणी देखील पार पडली. पणतू यानंतर लगेचच पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल तडकाफडकी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी ११ वाजल्यापासून ते १५ मे पर्यंत १० दिवसांचा कडक लॉकडाऊन कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आला होता. या निर्णयानंतर सामान्य कोल्हापूरकरांनी देखील नाराजी व्यक्त केली होती निवडणूक झाल्यानंतरच लॉकडाऊन का ? याआधी गरज असताना राजकीय फायद्यासाठी टाळाटाळ केली का ? असा सवाल उपस्थित केला जात होता.

परंतु आता नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. लॉकडाऊन नाही, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 5 मे 2021 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून 13 मे 2021 सकाळी सात वाजेपर्यंत जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. या काळात नागरिकांनी कोणत्या बाबींचं पालन करावं, याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 5 मे पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 15 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार होता.

महत्त्वाच्या बातम्या