विद्यापीठ संस्थेच्या व्यापक हितासाठी सिनेट(पदवीधर )निवडणूक लढवण्याचा निर्णय-उल्हास उढाण

Ulhas Udhan

औरंगाबाद – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या सिनेट(पदवीधर )निवडणूकीत सिनेट पदवीधर गटातून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी हि निवडणूक लढवण्याचा निर्णय आपण घेतला असल्याची माहिती राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य उल्हास उढाण यांनी दिली.विद्यापीठ हि या विभागातील एक प्रमुख आणि महत्त्वपुर्ण संस्था आहे.या विभागातील लक्षावधी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे,त्यासाठीच्या आवश्यक त्या सोयी सुविधा आणि सवलती उपलब्ध व्हाव्यात यासाठी विधायक विचाराची सिनेट आणि व्यवस्थापन परिषद स्थापित होणे आवश्यक आहे. या विचाराला मुर्तस्वरुप देण्यासाठी तसेच मराठवाड्यातील सहकाऱ्यांच्या अग्रहाखातर आपण हा निर्णय घेतला आहे.हि निवडणूक आपण मराठावाडा विभागातील विद्यार्थ्यांचे,पदवीधरांचे,प्राध्यापकांचे विद्यापीठ स्तरावरील विविध प्रश्न सोडविण्यासाठीच्या व्यापक भूमिकेतून लढवत आहोत असं उढाण यांनी म्हटलंय