fbpx

बिग बॉसच्या घरात वादाची ‘ठिणगी’, शिवने काढले नेहाचे संस्कार

टीम महाराष्ट्र देशा- बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. घरामध्ये नवनवीन टास्क रंगायला सुरुवात झाली आहे. एकाहून एक नवनवीन टास्क सुरु असतानाच बिग बॉसने घरातल्या सदस्यांना ‘शाळा सुटली पाटी फुटली’ हे नवीन साप्ताहिक कार्य दिलं आहे.

‘शाळा सुटली, पाटी फुटली’ या टास्कमध्ये सदस्यांना शालेय विद्यार्थ्यांचे कपडे परिधान करावे लागणार आहेत. या टास्क दरम्यान खोडया केल्यामुळे नेहा शितोळे हिला कान पकडून उभा राहण्याची शिक्षा दिली गेली. ती कान पकडून उभी असताना शिवने तिला खडू फेकून मारल्यामुळे त्या दोघात वाद होताना पाहायला मिळाले.

यामुळे नेहाने बिग बॉसकडे तक्रार केली. यानंतर शिवनेही तिला खडसावून उत्तर दिले. यामुळे घरात पुन्हा वाद सुरु झाले. हे भांडण थांबण्यासाठी किशोरी शहाणे यांनी प्रयत्न केले. परंतु नेहा व शिवमधील भांडण थांबले नाही.