व्हेन्टिलेटर अभावी महिलेचा मृत्यू

नागपुरातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना

नागपूर : नागपूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ‘व्हेन्टिलेटर’ न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली. लीलाबाई खोब्रागडे (५५) रा. पिपळा डाकबंगला, सावनेर रोड असे त्या मृतक दुर्देवी महिलेचे नाव आहे. आवश्यकतेपेक्षा कमी ‘व्हेन्टिलेटर’ असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपुरातील मेडिकल रुग्णालयात सुमारे दीड हजार रुग्ण भरती असतात, तर दररोज २२०० हून अधिक रुग्ण बाहय़रुग्ण विभागात उपचार घेतात. मेडिकल हे मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्यानंतरही रुग्णांना पाहिजे त्या आरोग्यसेवा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत लीलाबाईंना पोटाचा विकार होता. सावनेरला त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पोटाच्या विकारासह डेंग्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सावनेरच्या डॉक्टरांनी लीलाबाईंना नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात किंवा मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २३ तारखेला लीलाबाईंना मेडिकलच्या वार्ड क्र. २४ मध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीरच होती. दिवस कसाबसा काढल्यानंतर २४ तारखेला सकाळपासून त्यांना ‘व्हेन्टिलेटर’ची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ‘व्हेन्टिलेटर’ उपलब्ध नसल्यामुळे काहीच करता येणार नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. सकाळपासून कुटुंबीय ‘व्हेन्टिलेटर’च्या प्रतीक्षेत होते. मात्र, अतिदक्षता विभागात भरती असलेल्या इतर गंभीर रुग्णांना ‘व्हेन्टिलेटर’ लागल्यामुळे त्यांना ‘व्हेन्टिलेटर’ भेटलेच नाही. रात्रीपर्यंत वाट पाहिली. मात्र, ‘व्हेन्टिलेटर’अभावी लीलाबाईंचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

गंभीर रुग्ण जास्त आणि ‘व्हेन्टिलेटर’ कमी असल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचा मृत्यू होत असून, डॉक्टर हतबल आहेत. यवतमाळचे सर्वच शेतकरी ‘व्हेन्टिलेटर’वरमेडिकल रुग्णालयातीळ एकूण व्हेंटिलेटर्सपैकी १८ ‘अँडल्ट’साठी आहेत. अतिदक्षता विभागात 8 ‘व्हेन्टिलेटर’, ‘स्वाईन फ्लू’ वार्डसाठी ४, ‘रिकव्हरी’मध्ये ५, तर ३ पेडियाट्रिक विभागात ३, तर याशिवाय ट्रामा केअर सेंटरमध्ये ८ ते ९ ‘व्हेन्टिलेटर’ आहेत यवतमाळ जिल्हय़ातील ८ ते १० विषबाधित शेतकरी मागील १५ दिवसांपासून मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ‘व्हेन्टिलेटर’वर उपचार घेत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना ‘व्हेन्टिलेटर’ मिळत नाही. परिणामी, इतर गंभीर रुग्णांचा ‘व्हेन्टिलेटर’अभावी मृत्यू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

You might also like
Comments
Loading...