मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

टीम महाराष्ट्र देशा: गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ उद्या मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

उद्याचा महाराष्ट्र बंद शांततेत पाळण्याच आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आल आहे, तसेच परिवहन सेवा ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणता ठोस निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती  करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
You might also like
Comments
Loading...