घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण स्थगित, आठव्या दिवशी प्रशासन झाले जागे

औरंंगाबाद : घाटी रूग्णालयात कार्यरत असलेल्या १६४ कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेले कंत्राटी कर्मचा-यांचे आमरण उपोषण गुरूवारी (दि.११) स्थगित करण्यात आले.

घाटीतील कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम करावे यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने नंदाबाई हिवराळे, संगिता शिरसाट, मनिषा हिवराळे, निता भालेराव यांनी आठ दिवसापासून अधीक्षकाच्या दालनासमोर उपोषण सुरू केले होते. याबाबत आयटकचे अभय टाकसाळ यांनी घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांना उपोषणाबाबतची माहिती दिली.

डॉ.येळीकर यांनी कंत्राटी कर्मचा-यांना घाटीच्या सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे शिफारस करू असे आश्वासन दिल्यावर कर्मचा-यांनी गुरूवारी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी आयटकचे सचिव अभय टाकसाळ, नंदाबाई हिवराळे, संगिता शिरसाठ, मनिषा हिवराळे, निता भालेराव, शृती रूपेकर,राजु हिवराळे आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

IMP