मुंबई : प्रसिद्ध गायक केके यांनी मंगळवारी रात्री या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. तो कोलकात्यात लाइव्ह शो करत होता. शो संपल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रसिद्ध गायकाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. देशातील प्रसिद्ध गायक केके यांचे केवळ बॉलीवूडशीच नाही तर क्रिकेटशीही घट्ट नाते होते. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने संपूर्ण भारताला धक्का बसला आहे. संपूर्ण देशात शांतता आहे. केके यांचं निधन झालं यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. या घटनेनंतर क्रिकेट जगतातील सध्याच्या आणि अनेक माजी खेळाडूंनीही प्रतिक्रिया देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केके या नावाने प्रसिद्ध असलेले कृष्ण कुमार कुननाथ यांचे क्रिकेटवरील प्रेम त्यांच्या गाण्यांवरून सहज लक्षात येते. क्रिकेट विश्वचषक १९९९ च्या थीम सॉंगला त्यांनी आपला आवाज दिला होता. ज्यांनी तो विश्वचषक जवळून पाहिला होता, त्यांच्या आठवणी हे गाणं ऐकल्यावर नक्कीच ताज्या होतील. हे गाणे केकेने ‘देखो-देखो, देखो-देखो जोश ऑफ इंडिया’ या नावाने गायले होते.
व्हिडिओमध्ये क्रिकेटचे अनेक सीन्स दिसत आहेत. या गाण्यात विश्वचषक संघातील अनेक खेळाडूही दिसत आहेत. त्यावेळचे प्रसिद्ध खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडही या गाण्यात पाहायला मिळत आहेत. या विश्वचषकात सर्वाधिक धावा भारताचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविड (४६१) च्या नावावर आहेत. या विश्वचषकात विजयी संघ ऑस्ट्रेलिया होता.
महत्वाच्या बातम्या: