बकरी ईदसाठी मामाकडे आलेल्या मुलाचा मृत्यू

कुऱ्हा (अमरावती) : गावापासून एक कि.मी अंतरावर असलेल्या तिवसा रोड वरील तलावात बुडून एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मुलगा बकरी ईद साठी मामा कळे आला होता.

मुस्लिम बांधवांच्या ईदगाच्या टेकडी मागील खदानी मध्ये असलेल्या तलावात अमरावती येथील तरुणांचा पोहायला गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. बकरी ईद निमित्य कुऱ्हा गावात राहणाऱ्या मामाकडे (मोहम्मद रफिक म. युसूफ) आला होता. रविवारी सकाळी ११ वाजता मावशीकडे जात आहे. असे सांगून घरून गेला पण मावशीकडे न जाता तो गावाला लागून असलेल्या खदानी परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेला. तलावात पोहताना त्याचा बुडून मृत्यू झाला. हा मुलगा अमरावती येथील अकबर नगर मधील असून त्याचे नाव अरबाज शेख सत्तार (वय १८ वर्ष) आहे. या भागात गुरे चारण्यासाठी गेलेल्या माणसाला तलावाच्या परिसरात कपडे, घड्याळ, मोबाईल, चप्पल आढळून आले. मात्र तलावात कोणीही नसल्याने त्याला संशय आला आणि त्याने गावातील लोकांना कळविले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हा अमरावती इर्विन येथे पोस्मार्टम साठी पाठविला आहे.