fbpx

दिवंगत उपमहापौरांच्या मुलीला युती कडून उमेदवारी जाहीर

पुणे : पुणें महानगरपालिकेच्या रिक्त जागेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. माजी दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे हे प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले होते. त्यांच्या रिक्त जागेवर पोट निवडणूक होणार आहे. आता या जागेवर कांबळे यांची कन्या हिमाली यांना भाजप आणि रिपब्लिकन पक्षाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. आता निवडणूक बिनविरोध व्हवी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिमानी कांबळे या सध्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले वय त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणी म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे.

तसेच ही निवडणूक बिनविरोध करावी, असा भाजप आणि रिपाई नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार कॉग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यशी बोलण झालं असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या शी देखील चर्चा करणार असल्याचे बापट यांनी सांगितले