दिव्यांग मातापित्याच्या कन्येने दहावीत मिळवले 96.40 टक्के गुण ;अधिकारी होण्याची इछा

mandira survase

तुळजापूर-  तालुक्यातील अपसिंगा येथील कु. मंदीरा संजय सुरवसे या विद्यार्थीनीने घरची अत्यंत हालाखीच्या परिस्थिती असताना ही आईचे श्रम व अथक  कष्टाचा जोरावर  दहावीच्या परीक्षेत 96.40 टक्के गुण मिळवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

कु. मंदीरा हिचे वडील श्री. संजय सुरवसे हे दिव्यांग आहेत तर आई गृहीणी आहे. मंदीराची आई शिवणकाम करुन आपल्या मुलीला  शिकवले असुन मंदीरानेही आई वडीलाचा कष्टाची चीज आहे केली आहे.

शेती नाही नवरा दिव्यांग अशा बिकट परिस्थितीतही मंदीराचा आईने आपल्या मुलीला शिकवण्याचा निर्धार केला. घरी ‘अठराविश्व दारिद्र्य’ असतानाही कु. मंदीरा हिने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. तिचे अचाट प्रयत्न व प्रबळ इच्छाशक्ती ने हे यश संपादन केले .
पुढील शिक्षणासाठी तिला अर्थिक मदतीची गरज असुन त्यासाठी दाते पुढे आले तरच ती पुढील शिक्षण घेवु शकणार आह

भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायाचे

आपल्या या यशाविषयी बोलताना मंदीरा सांगते की घरची गरीबी वडील अपंग अशा कठीण परिस्थितीत आईने मला कष्ट करुन शिकवले  ‘माझ्या या यशात आई-वडीलांचा व शाळेतील शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.’ त्याचबरोबर मुलींनी न खचता, न घाबरता शिक्षण घ्यावे व आत्मनिर्भर बनावे’ असंही तिनै यावेळी सांगितले .

महत्वाच्या बातम्या-

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

नंदुरबार : संकटकाळातील शैक्षणिक प्रगतीबद्दल निती आयोगातर्फे जिल्ह्याचे कौतुक