अखेर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे लांबणीवर पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त मिला आहे. आज या संदर्भात तारीख जाहीर करण्यात आली आहे. १५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ असणार आहे.

१४ डिसेंबर रोजी गुजरातचं मतदान झाल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. गुजरातच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकले असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. पण, अखेर याला मुहूर्त मिळाला आहे.

अमित शहा यांचा पुत्र जय शाह यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, जीएसटीच्या अंमलबजावणीतले घोळ या विषयावरुन विरोधक हिवाळी अधिवेशनात गदारोळ करण्याची शक्यता होती. अधिवेशनातल्या विषयांची मीडियातही हेडलाईन होत असल्यानं सरकारला गुजरातच्या रणधुमाळीत हा धोका पत्करायचा नव्हता असा आरोप होतोय. त्यामुळे या सर्व आरोपांवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक एकवटनार हे मात्र नक्की आहे.Loading…
Loading...