धोका रात्रीच्या अंधारात होतो, दिवसा ढवळ्या शिवाजी पार्कवर कसा ?

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट जनादेश मिळाला. मात्र तरीही अल्पमतातील तीन पक्षांनी राज्यात सरकार स्थापन केले. मित्रपक्षाने विश्वासघात केल्याने तीन पक्षांचे अपघाती सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले.

मात्र ” धोका रात्रीच्या अंधारात होतो, दिवसा ढवळ्या शिवाजी पार्कवर कसा ? असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तसेच पक्षाला पुरेशी माहिती न देता पहाटेच्या वेळी होणाऱ्या शपथ विधीत विश्वासघात होतो, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यास माझा विरोध नाही, असण्याचे कारण नाही. त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी मी प्रयत्न केले होते. तसेच पक्षात कुणाला कोणते पद द्यायचे याचा अधिकर आमचे नेते शरद पवारांना आहे.अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास विरोध असणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या :