मनसे कार्यकर्त्यांवर दाखल केलेला दरोडयाचा गुन्हा मागे घ्यावा- बाळा नांदगांवकर,

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले निवेदन .

टीम महाराष्ट्र देशा – मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुण्यात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन पुकारून राजाराम पूल आणि जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली होती. या तोडफोडीनंतर अंदाजे ४० ते ५० मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात सिहंगड रोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांवर दाखल केलेला दरोडयाचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी मनसे नेते बाळा नांदगांवकर, माजी नगरसेविका रुपाली पाटील, नगरसेवक वसंत मोरे, बाबू वागसकर, गणेश सातपुते आणि किशोर शिंदे यांनी आज, शनिवारी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना निवेदन दिले.

परप्रांतीयांकडून आमच्याविरुद्ध आकसापोटी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जोपर्यंत त्या फेरीवाल्यांच्या विरोधात आमची तक्रार दाखल केली जात नाही तोपर्यंत जामीन आम्ही घेणार नाही अशी भूमिका घेत या पदाधिकाऱ्यांनी काल सिहंगड रोड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते.

 

You might also like
Comments
Loading...