fbpx

लॉजमधल्या ग्राहकांची नोंद थेट होणार ‘एसपी’कडे

maha_police

सिंधुदुर्ग : लॉज आणि सायबर कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची माहिती आता CVIRMS या अॅप द्वारे रजिस्टर करून ठेवली जाणार आहे. त्यामुळे लॉज आणि सायबर कॅफेमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंद पोलीस अधीक्षकांजवळ या अॅप द्वारेच होणार आहे.

लॉज आणि सायबर कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची माहिती एवढे दिवस लॉजच्या रजिस्टरवर लिखित स्वरुपात ठेवली जात होती. परंतु आता मात्र अशा प्रकारे लिखित स्वरुपात हि नोंद ठेवण्याची गरज नाही. कारण आता सिटी व्हीजिटर्स इन्फर्मेशन अॅन्ड रेकॉर्ड मेंटेनन्स सिस्टीम या नावाचं नवीन अॅप लाँच करण्यात आले आहे. आता लॉज तसच सायबर कॅफेत येणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंद या अॅप मध्येच होणार आहे. या अॅपद्वारे येणाऱ्या ग्राहकांची माहिती कशाप्रकारे भरायची असते आणि ती कशी रजिस्टर करायची या विषयी पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या सहकार्याने कुडाळ पोलीस ठाण्यात लॉज मालकांना गुरुवारी महिती देण्यात आली.

अंटेलोप कॉर्पोशन प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन सेंगावकर यांनी हि माहिती दिली. दीड वर्षापासून या अॅपवर काम चालू होते. २ महिन्यापूर्वी हे अॅप लॉच झालं आहे. या अॅप वापराबाबतची जनजागृती आतापर्यंत रायगड आणि रत्नागिरीमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अॅपबद्दल जनजागृती करत आहेत. यावेळी कुडाळ तालुक्यात अनेक हॉटेल मालक, पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, सचिन सेंगावकर, त्यांचे सहकारी आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या अॅप बद्दल हॉटेल मालकांमध्ये अनेक शंका होत्या त्या शंकांबद्दल सचिन सेंगावकर यांनी मार्गदर्शन केल आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच हे अॅप कुडाळ मधील काही लॉज मालकांना १५ दिवसांसाठी वापरण्यास देणार आहे. त्यांमुळे त्या अॅपबद्दल लॉज मालकांना ज्या काही त्रुटी वाटतील त्या लवकच दुरुस्त करून ते सर्वंना सोयीस्कररित्या वापरता येईल असे बदल करून ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यात एक हजार रुपये भरून हा अॅप लॉज मालकांसाठी उपलब्ध आहे.