बारामती पोलिसांनी वर्दीत असणाऱ्या CRPF जवानाला खोलीत डांबून केली मारहाण

blank

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे.

ही घटना ताजी असतानाच बारातीमधील पोलिसांनी एका CRPF जवानाला खोलीत डांबून मारहाण केल्याचो घटना समोर येत आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यासाठी सीआरपीएफ जवान अशोक इंगवले बारामती पोलिस ठाण्यात आले होते. इंगवले यांनी दुचाकीवर दोन भावांसह एक लहान मुलगाही बसवला होता. त्यामुळे “दुचाकीवरुन ट्रीपल सीट का आलात?” अशी विचारणा करत अशोक इंगवले या सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण केली. विशेष म्हणजे, इंगवले यांच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली.