राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी मतात परिवर्तीत होत नाही : रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत बोलणारे महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते व नेते आहेत. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते.पण या गर्दीचे रुपांतर मतात परिवर्तीत होत नसल्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे भाजपाने मनसेसोबत युती केल्यास त्याचे मोठे नुकसान भाजपालाच होईल, असे मत केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

तसेच मनसेने झेंड्याचा रंग बदलून त्यांचा कोणताही राजकिय फायदा होणार नाही, त्याऐवजी आपले मन व भूमिका बदलावी, असे सल्लाही आठवले यांना दिला आहे. संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी भीमा कोरेगाव प्रकरण, शेतकरी मदत, मनसे, 370 कलम तसेच नागरिकत्व कायद्याबद्दल त्यांनी भाष्य केले. भाजपाला बहुजनांच्या मतांसाठी मनसेची आवश्यकता नाही. दलित, अल्पसंख्याक व बहुजनांची मते मिळवून देण्यासाठी आरपीआय समर्थ आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

Loading...

तसेच भीमा कोरेगाव येथील दंगलीची एसआयटीकडून चौकशी होणार असल्याबाबत विचारले असता आठवले म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी मराठा समाजाने दाखवलेल्या सामंजस्याची भूमिका उल्लेखनीय आहे. तरीही प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या बंदच्या हाकेत, मंत्री म्हणून जरी भुमिका घेता येणे शक्य नसले तरी समाजासाठी माझा संपूर्ण पक्ष त्यात अग्रभागी होता. तसेच नवीन सरकारलादेखील या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण