राज्यकारभार ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरु, शिवसेनेची सरकारवर टीका

udhav thakare vr cm

मुंबई: मराठीचा अवमान होत असताना शिवसेना सत्तेच्या लाचारीपायी सभागृहात गप्प बसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी होती. दरम्यान शिवसेनेनं ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधीमंडळात राज्यपालांचं अभिभाषणाचा अनुवाद मराठीत ऐकू न आल्यानं आता शिवसेनेनं ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरु आहे त्याचाच हा उत्तम नमुना आहे.’ अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाषणाचा अनुवाद गुजरातीतून ऐकू आल्याचा विरोधकांचा आरोप खरा नाही. असं म्हणत सेनेनं भाजपची काहीशी पाठराखणही केली आहे.