मुंबई : कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षानंतर वारकऱ्यांची वारी सुरू झालेली आहे. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. अनेक भक्त या वारीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामध्ये मराठी कलाकार देखील या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.
दिपाली सय्यद यांनी त्याचे वारीमधील काही फोटो फेसबुकवर शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल… महाराष्ट्रावर आलेली संकट दुर होऊन चांगले दिवस येऊदे यासाठी भाव भक्तीने देवाकडे साकडे घातले. तहान भुक विसरून वारकर्यांन सोबत हरिनाम जप केला. वारी’ हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. जय हरी माऊली”.
दीपाली सय्यद यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक लोक कमेंट करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना ट्रोल करायला देखील सुरवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<