श्रीलंका दौऱ्यावर संधी न मिळाल्यानं ‘या’ क्रिकेटपटूनं व्यक्त केली नाराजी

श्रीलंका

मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.

बीसीसीआयने श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या  संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. 6 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

हा दौरा म्हणजे नवोदीत खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. या टीममध्ये निवड न झाल्याने सौराष्ट्राचा माजी बॅट्समन शेल्डन जॅक्सन निराश झाला आहे. त्याने ट्विटरवर त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू रोहन गावसकर याने जॅक्सनला निराश न होता आगामी संधीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP