Share

Sanjay Raut | मोठी बातमी! राऊतांच्या जामीन स्थगितीची ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर एकाच दिवशी सुनावणी पार पडली.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला. ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने निर्णय देत ईडीला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे.

न्यायालयाकडून ईडीची ही मागणी फेटाळण्यात आल्याने आता संजय राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, या विरोधात ईडी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, “हे लहान प्रकरण नाही. अनेक मोठी नावे यात गुंतलेली आहेत. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी आणि निकालाला आव्हान देण्याची संधी द्यावी”, असं ईडीच्या वतीने सांगण्यात आलं होतं. प्रत्येक तपास यंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठराविक वेळ द्यावा असे नाही, पण आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आदेशाला स्थगिती द्यावी,’ अशी मागणी ईडीने केली होती.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now