राजू शेट्टी आणि सदाभाऊ पुन्हा एकत्र पण…

राजू शेट्टींना

टीम महाराष्ट्र देशा: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांची मैत्री आणि आंदोलनातील आक्रमकपणा हा जगजाहीर होता. शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात या दोन शेतकरी नेत्यांनी रस्त्यावर पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या. आता एकमेकांपासून दूर गेलेले हे कधीकाळचे मित्र अशाच एका आंदोलनामुळे पुन्हा एकत्र येणार आहेत.

Loading...

फलटण तालुक्यात २०१३ मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलनप्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना फलटण न्यायालयाने दि.१६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आत तर राजू शेट्टी उपस्थित राहणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे परंतु, सदाभाऊ खोत हिवाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहणार की नाही याबाबत साशंकता आहे.

शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या या दोन्ही नेत्यांत फूट पडल्यानंतर कोर्ट तारखेच्या निमित्ताने ते एकत्र येण्याचा योग आला आहे. यामुळे दोघेही उपस्थित राहणार का? याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.Loading…


Loading…

Loading...