रॉबर्ट वाड्रा यांना उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी न्यायालयाने दिली परवानगी

टीम महाराष्ट्र देशा : भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वाड्रा हे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. मात्र रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. तर ती परवानगी दिल्लीच्या एका न्यायालयाने दिली आहे.

न्यायालयाच्या परवानगी नुसार रॉबर्ट वाड्रा यांना केवळ अमेरिका आणि हॉलंडमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. लंडनला जाण्याची मागणी न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आली आहे.

दरम्यान मनी लॉड्रिंगप्रकरणी आरोपी असलेले प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून(ईडी) पुन्हा एकदा चौकशी होत आहे. लंडनमध्ये वाड्रा यांची १.९ लक्ष पौंडांची मालमत्ता असल्याचा संशय आहे.