fbpx

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात, तरी इतर देशांच्या मानाने बळकट : निर्मला सीतारामन

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनीच अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. तर दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नेमके चालयं तरी काय असा प्रश्न आता समोर आला आहे?

मागील 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. मागच्या 70 वर्षात देशात इतका चलन तुटवडा पहिल्यांदाच झाला असून सरकारनं परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेतल पाहिजे. आणि उपाययोजना केल्या पाहिजेत, असे राजीव कुमार म्हणाले.

तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धामुळे जग मंदीच्या झळा सोसतंय. अशावेळी, भारतीय अर्थव्यवस्था डळमळू न देता ती अधिक बळकट करण्यास केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान तस पाहता जगात आणि देशात मंदीचे वातावरण आहे. दिवसाअखेर अनेक कंपन्या बंद पडत आहेत. लाखो बेरोजगार नवीन नोकरीच्या शोधात आहेत. तर ज्यांना रोजगार आहे ते ही अर्ध्या पगारात नोकरी करत आहेत. ऑटो क्षेत्र, कापड क्षेत्रातील अनेक कंपन्याना मालकांनी टाळ मारल आहे. तर या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य क्षेत्र देखील डबघाईला आले आहे. अशी विदारक परिस्थिती असताना देखील देशाच्या अर्थमंत्री सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर समाधान मानत आहेत.