देशाला मराठी पंतप्रधान मिळेल, फडणवीसांचे सूचक विधान

नागपूर : देशाला एक नव्हे तर जास्त मराठी पंतप्रधान मिळतील. मराठीचा झेंडा अटकेपार लागण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी २०५० पर्यंत एक नव्हे तर अधिक माणसे आपण निश्चितच पाहू,असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नागपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

स्वातंत्र्योत्तर काळापासून महाराष्ट्रात अनेक निपूण राजकारणी होऊन गेले असले तरी आजतागायत मराठी माणूस पंतप्रधान पदी विराजमान झाला नाही.त्यावरूनच फडणवीस यांना प्रश्न विचारला होता.येत्या काळात महाराष्ट्रातून फडणवीसांंनाही भाजप पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे करू शकतो,अशा चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतात.त्याला अनुसरूनच आता फडणवीसांचे सूचक विधान आले त्यामुळे या चर्चांना उधान आले आहे.