देशावरचा घातपात टळला; शस्त्रास्त्र, स्फोटकांसह दिल्लीत ६ दहशतवाद्यांना अटक

delhi

नवी दिल्ली : भारतावरचा मोठा घातपात आज दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला असल्याचे पहायला मिळत आहे. देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 6 जणांना अटक केली आहे. यातील दोन जण हे पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्यासह प्रयागराज इथं छापा टाकला. यावेळी सहा जणांना अटक केली आहे. प्रयागराजमधील करेली या भागात हे सहा जण लपून बसले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या आदेशांवर त्यांचं काम सुरू होतं.

दहशतवाद्यांचं मॉड्युल उद्ध्वस्त करण्यासाठी जवळपास महिनभर दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल कार्यरत होतं. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपाती कारवाया घडवण्याचा त्यांचा हेतू होता. त्यासाठीची योजना त्यांनी तयार केली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात फिरून ते रेकी करत होते. पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळाल्यावर त्यांनी तिन्ही राज्यांत छापे टाकत ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार हे सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या असल्याने देशावरचा मोठा धोका टळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या