देशाला दोन पंत प्रधानांची गरज आहे – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : या देशाला दोन पंतप्रधानांची गरज आहे. नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पंतप्रधान असून देशाचा गाडा हाकण्यासाठी दुसऱ्या पंतप्रधानाची आवश्यकता आहे. असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. तर ” ज्यादिवशी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राफेलवर बोलतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी स्वतःचे कपडे फाडतील, असेही आंबेडकर म्हणाले. राहुल गांधींकडे हुकमाचा एक्का राफेल असताना दुरी तीरी ने का खेळत आहेत ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

एक कोटी नोकऱ्या निर्माण करणार असे सत्ताधारी पक्ष सांगत आहे. मात्र राज्यात गेल्या पाच वर्षात दोन लाख छोट्या मोठ्या कंपन्या बंद झाल्यात. आठ लाख लोक बेरोजगार झाले. तरीही देशातील अंबानी ग्रुपला फायदा मिळावा म्हणून हे सर्व चालले असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय त्यांनी मुंबईतल्या 13 सीट वर मुस्लिम वंचित सोबत आले तर सेना बीजेपी त्या ठिकाणी जिंकू शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी मॉब लिंचिंग थांबवायचे असेल तर सेना भाजपचे सरकार येऊ देऊ नका. हे सर्वसामान्यांचे सरकार नाही तर श्रीमंत उद्योगपतींचे सरकार आहे. आधी मोदींनी पंधरा लाख देतो सांगितलं पण आता खिशात आहेत तेही पैसे काडून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तर आता भाजपा आणि या पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी ने पाट्या टाकल्या. आमच्या अजेंड्यातल्या अनेक गोष्टी इतर राजकीय पक्षांनी कॉपी पेस्ट करून दुष्काळी भागात पाणी फिरविण्याचा मुद्दा आम्ही अजेंड्यात घेतल्यानंतर भाजपने हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यात घेतला आहे. असा आरोपही त्यांनी भाजपावर केला. तर माझा लिंबूचा धंदा आता राजनाथ सिंह करू लागलेत असा टोलाही त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या :