देशाचे प्रमुख देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जात आहेत – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा- लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो. देशाचे प्रमुख देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जात आहेत. नोटाबंदी हे एकाधिकारशाहीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. साहित्यिक, कलाकार सर्वांनीच या एकाधिकारशाही विरोधात आवाज उठवला आहे.

जागतिक स्तरावरील अहवालात भारतात उपाशी राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याचे नमूद केले आहे. शरद पवार कृषीमंत्री झाल्यानंतर अन्न सुरक्षा कायदा आणला. तेव्हा ११९ देशांपैकी भारत ५४ व्या क्रमांकावर होता. आज भारत १०० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. असे अजित  पवारांनी हल्लाबोल आंदोलनात भाष्य केलं.

You might also like
Comments
Loading...