‘देश संकटात आहे, पण आपण यामधून नक्की बाहेर पडू’ – सुनील गावस्कर

blank

टीम महारष्ट्र देशा :  देशभरात अनेक ठिकाणी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलने झाली. त्यानंतर दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. त्याच्यानंतर हिंसाचार उसळला. त्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. या घटनांवर अनेकजणांनी सोशल मिडियावर प्रीतीक्र्या देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कलाकार, राजकीय व्यक्ती या सोबत खेळाडू यांनीहि आपली मत व्यक्त केली. या सर्व घडामोडींवर शनिवारी लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत माजी महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणतात, “देश संकटात आहे. देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शिक्षण घेणे, अभ्यासात रमणे महत्त्वाचे आहे. आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यात याच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे”.

पुढे ते म्हणतात, “आपण एकजूट असू, तरच आपण पुढे जाऊ शकू. खेळाने आम्हाला हेच शिकवले की, एकत्र प्रयत्न केल्यावर आपण जिंकतोच. यापूर्वी भारताने बर्याच संकटांवर मात केली. त्यामुळे यावरही मात करेल आणि एक सामर्थ्यवान देश बनेल. आपण सर्व सामान्य भारतीय आहोत. खेळ आपल्यालाच हीच भावना शिकवते”.