देशाचे नेतृत्व यापूर्वीही ब्राम्हण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल : आ.कुलकर्णी

पुणे : समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र ही असमानता निर्माण करणा-या ‘बारामतीकरांच्या’ लक्षात येत नाही की, यापुवीर्ही देशाचे नेतृत्व ब्राम्हण समाजाने केले आहे. आणि यापुढेही करेल असे वादग्रस्त वक्तव्य कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्या टीकेचे लक्ष होण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ब्रह्मोद्योग-२०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार शोभा फडणवीस, आमदार मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या मोहिनी पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘मातृशक्तीचा जागर’ मेळाव्यात उद्योजिका जयंती कठाळे, मोहिनीताई मोडक, आरजे शोनाली रानडे, सविता वासेकर, मंजुश्री कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

प्रत्येकाच्या अकौंटमध्ये १५ लाख जमा करणार, असं मोदी बोललेच नव्हते; माधव भांडारी यांचा दावा

महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या इतर महिला नेत्याप्रमाणे सुप्रिया सुळेंचेही मौन