देश भावूक होतो अन हे फाईल्स गायब करतात, चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा परत मोदींवर निशाणा

Namo vs Raga

दिल्ली : एप्रिल मध्यापासून भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील(LAC) तणाव वाढला असून चीनने या भागातील हालचाली देखील वाढवल्या आहेत. याचवरून आता काँग्रेसचे प्रमुख नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काल थेट मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान दिले होते. तर, आज पुन्हा याच महत्वाच्या दस्तावेजांच्या अफरा-तफरीवरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले आहे.

यावेळी त्यांनी, ‘जेव्हा जेव्हा देश भावूक होता, तेव्हा फाईल्स गायब होतात’, असा आरोपच केंद्र सरकारवर लावला आहे. एवढंच नाही तर पुढे ट्विटमध्ये त्यांनी काही उदाहरणे सुद्धा दिली आहेत. ‘माल्या असो वा राफेल, मोदी किंवा चोक्सी… आता हरवलेल्या कागदपत्रांच्या यादीत नवीन आहेत, चिनी आक्रमणाचे दस्तावेज. हा केवळ योगायोग नसून मोदी सरकारचा लोकशाही विरोधातला प्रयोग आहे’ अशा शब्दांत ट्विट करत मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

अभिषेक बच्चनही झाला कोरोनामुक्त ; तब्बल २८ दिवसानंतर केली कोरोनावर मात

दरम्यान, कालदेखील चिनी घुसखोरीच्या कागदपत्रांवरून थेट मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान दिले होते. राहुल गांधी यांनी, ‘ चीन का सामना करना तो दूर की बात, भारत के प्रधानमंत्री में उनका नाम तक लेने का साहस नहीं है. इस बात से इनकार करना कि चीन हमारी मातृभूमि पर है और वेबसाइट से दस्तावेज़ हटाने से तथ्य नहीं बदलेंगे’, असे ट्विट करत मोदींवर जहरी टीका केली होती.

अयोध्येतील ‘त्या’ जमिनीवर सुन्नी उक्फ बोर्ड उभारणार ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर

तर, महत्वाची कागदपत्रे संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये, लडाख भागात चीनने घुसखोरी केल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, हि कागदपत्रे आता हटवण्यात आल्याचे आरोप राहुल गांधी यांनी लावले आहेत. दरम्यान, ‘मूड ऑफ दी नेशन’ या इंडिया टुडेच्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक जनतेने देशाच्या सुरक्षेसंदर्भात राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत असलेल्या टीकेवरून नाराजी व्यक्त केली होती.

पैसे कमावणे हाच शिवसेनेचा एकमेव धंदा आहे,राणेंनी पुन्हा एकदा केले शिवसेनेला लक्ष्य