fbpx

जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही – गडकरी

नितीन गडकरी

नागपूर- मला खूप लोक येऊन भेटत असतात. मला म्हणतात माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे. अशावेळी मी त्यांना सर्वप्रथम घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो, असे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक केले आहे. नागपूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, जो व्यक्ती आपले स्वतःचे घर, मुले, परिवार सांभाळू शकत नाही तो व्यक्ती देश सांभाळू शकत नाही.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाचं काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी कान टोचले आहेत.

मला खूप लोक येऊन भेटत असतात. मला म्हणतात माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे. अशावेळी मी त्यांना सर्वप्रथम घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो, असे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक केले आहे