fbpx

भाजपच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला – जयंत पाटील

jayant patil hallabol nashik

निफाड : भाजपच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. देशाला मोदी नावाचे ग्रहण लागले असून निरव मोदी किंवा विजय मल्या हे सरकारच्या नाकाखालून पळून जातात तेव्हा सरकार झोपा काढतात का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हल्लाबोल मोर्च्यात बोलत असतांना उपस्थित केला.

जयंत पाटील भाजपवर टीका करतांना म्हणाले , भाजपच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. थेट बँका लुटून लोक फरार होत आहेत. असे चित्र भारतात कधीच नव्हते. या सरकारविरोधात आता जोर लावा. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपला बुथ सांभाळला, तरीही निवडणूक जिंकता येईल. असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

कमळावर शिक्के मारून ज्यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आणले, त्यांना आता पश्चाताप होत आहे. भाजपनी दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाहीत. कारण सरकारकडे आता फक्त एक वर्षे उरले आहे. जनतेला कळून चुकले आहे की यांना सत्तेवर बसवून आपण चूक केली. सरकारकडे नागरिकांची भूक भागवण्यासाठी नव्हे तर जाहीरातीसाठी पैसा आहे, असे बोलून जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

केंद्र सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेनवरही यावेळी जयंत पाटील यांनी निशाणा साधला. ‘या सरकारने महाराष्ट्राला कर्जात लोटलं आहे. हा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांसाठीचा नाही तर बुलेट ट्रेनसाठीचा आहे, असा आरोप त्यांनी केला. पेट्रोल-डिझेल व इतर सर्वच बाबतीत देशात महागाई वाढली असून या सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीच उरलेले नाही. आंतरराष्ट्रीय फूड इंडेक्सनुसार सध्या भारत गेल्या ७० वर्षांचा विचार करता अन्नधान्याच्या उत्पादनात सर्वांत मागे फेकला गेला आहे. पाकिस्तानच्याही मागे आपला देश गेला आहे, असेही ते म्हणाले.