सिल्लोड: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सज्ज राहून सरकारने नव्याने दिलेल्या निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट्य निर्धारित वेळेत पूर्ण करा. तसेच तालुक्यातील अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे स्पष्ट करीत अधिकाऱ्यांचे अपडाऊन खपवून घेणार नाही असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिला. मंगळवारी (दि.६) सिल्लोड येथे आयोजित शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी तसेच कोरोना संदर्भात शासनाच्या नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी मंगळवार ( दि. ६ ) रोजी सिल्लोड येथील नगर परिषदेच्या सभागृहात पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्देशित केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. आणि नियमांची अंमलबजावणी करणे हे शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे नवीन नियमानुसार सिल्लोड शहर व ग्रामीण भागात होणारे लग्न समारंभ, अंत्यविधी, अशा विविध कार्यक्रमात लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
गर्दी टाळण्यासाठी शहरातील भाजी मंडईचे विभाजन करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्याऱ्यांवर तसेच सोशल डिस्टनसिंग चे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी अशा शासकीय यंत्रणेने गावात राहून दररोज परिस्थितीचा आढावा सादर करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक ; ठाकरे सरकारने करून दाखवले यात शंका नाही
- कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची तयारी, पेमेंट बँकेच्या मर्यादेत दुपटीने वाढ
- ‘बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’ गंभीर आरोपानंतर परबांच भावनिक स्पष्टीकरण
- संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; महिला निर्मात्याने केले ‘हे’ गंभीर आरोप
- कोरोना नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या ३०० दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू