औरंगाबाद : नातेवाईकासाठी आमदार नाका बंदी करत असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातलत असल्याची घटना औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकात शुक्रवारी घडली. आमदार प्रशांत बंब त्यांच्या भाच्याला सोडवण्यासाठी थेट दाखल झाले. यावेळी त्यांची कर्तव्यावर असणाऱ्या फौजदार शिंदे यांच्याशी बाचाबाची झाली.
औरंगपुरा भागात क्रांती चौक पोलिसांनी नाका बंदी केली होती. कडक निर्बंधांचे आदेश असल्यामुळे पोलीस त्यांच्या कर्तव्यावर असताना. एक युवक सकाळी साडे आकाराच्या दरम्यान औरंगपुरा चौकातून जात होता. त्याला नाका बंदी वर असलेल्या कर्मचाऱ्यांनी अडवले, त्याला बाहेर का फिरत आहे अशी त्यांनी विचारना केली. त्यावर युवकाने नातेवाईक रुग्णासाठी पाण्याची बाटली, बिस्कीट पुडा घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शाहनिशा करण्याचे आदेश दिले.
यावरून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी डॉक्टरांशी बोलणे केले, यावर डॉक्टरांनी असे काही नाही असे सांगितले. त्यावरून उपनिरीक्षक शिंदे यांनी त्या युवकाला दंड भरण्यास सांगितला. त्या युवकाने प्रशांत बंब यांच्या भावाला संपर्क केला. त्यानंतर काही वेळात प्रशांत बंब हे नाका बंदीच्या ठिकाणी आले. त्यांनी सुरवातीला प्रकरणाची विचरणा केली. त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षकाला रुग्णाचे काम करत असलेल्या भाच्याला सोडण्यास सांगितले.
परंतु, तो पर्यंत पाण्याच्या बाटलीसाठी बाहेर पडणे योग्य नसल्यामुळे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. त्यावर प्रशांत बंब यांचा पारा चढला, त्यांनी उपनिरीक्षकाला बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्यावर उपनिरीक्षकांनी कायदा समजावत त्यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे आल्यानंतर हे प्रकरण निवळले.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानमधून होणाऱ्या तस्करीचा भांडाफोड, ८ तस्करांकडून ३०० कोटींचे हेरॉईन जप्त
- रेमडेसिविरसाठी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे एक तास धरणे आंदोलन
- पैठणकरांनो सावधान ! विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट ; २ पॉझिटीव्ह
- आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा ; ससूनमध्ये एका बेडवर तीन रुग्णांवर उपचार
- तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या मदतीसाठी माजी मंत्र्याचा आग्रह