आरबीआय’च्या ‘त्या’ अहवालानुसार कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. संपूर्ण जग ठप्प असून आयात-निर्यात ठप्प आहे. उत्पादन बंद, तयार उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेसमोरही मोठ्या आव्हानाला असणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने आपल्या चलनविषयक धोरण अहवालात काही कोरोना नंतरच्या काही महत्त्वाच्या बाबी नोंद केल्या आहेत. त्यानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिध्द केलेल्या आपल्या चलनविषयक धोरण अहवालात नमूद केले आहे की, कोरोना या संसर्गाचा परिणाम देशाच्या भविष्यकाळातही होणार आहे. लॉकडाऊनचा थेट परिणाम देशाच्या आर्थिकस्थितीवर होणार असून जागतिक उत्पादन, पुरवठा, व्यापार आणि पर्यटनावर येणाऱ्या भविष्यकाळात विपरित परिणाम होणार आहे, असा अंदाज या अहवालात नमूद करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांवर याचा तीव्र परिणाम झाला आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी २०२०-२१ पर्यंत आर्थिक विकासाचे दृष्टीकोन तयार केला गेला होता. परंतु कोरोनाच्या साथीने हा समज पूर्णपणे बदलला आहे.

त्याचप्रमाणे, कोरोनाची तीव्रता, व्याप्ती आणि कालावधी यासंबंधित परिस्थितीचे सध्या मूल्यांकन करण्याचे काम सुरु आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे तर दुसरीकडे जागतिक उद्योग व्यवसायात आलेली मंदी आली आहे. त्याचा निश्चितच देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. असेही आरबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आहे . त्याचप्रमाणे, आरबीआयच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा परिणाम थेट महागाईवर होणार आहे. पुरवठ्यातील अडचणींमुळे अन्नपदार्थाच्या किंमती घसरतील आणि बिगर-खाद्यपदार्थांच्या किंमती वाढतील. कोरोना विषाणूच्या साथीमुळे बर्या च अर्थशास्त्रज्ञांनी जगभरातील निर्यातींवर बंधने येण्याचा इशारा दिला आहे.

 

IMP