लहान मुलांसाठीही लवकरच येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस

वॉशिंग्टन : जगभरात सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ १६ वर्षावरील नागरिकांसाठीच आहेत. मात्र, आता वय वर्ष १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी फायझर कंपनीच्या लसीचा मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास लहान मुले देखील कोरोनापासून सुरक्षित होतील.

सध्या जगभरातील कंपन्यांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात अमेरिकेच्या फायझर कंपनीच्या लसीचाही समावेश आहे. मात्र, अमेरिकेत १६ वर्षांवरील तरुणांवर वापर करण्यास फायझर कंपनीच्या लसीला परवानगी देण्यात आली आहे. आता ‘फायझर-बायोटेक कोव्हीड-१९’ या लसीची चाचणी १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांवर करण्यात आली आहे. यात ही लस प्रभावी ठरली असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

भारतामध्येही पुढील काही महिन्यात मुलांसाठीची लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉडर्ना कंपनीच्या वतीनेही लवकरच लहान मुलांसाठी लस उपलब्ध करुन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या अखरेपर्यंत लहान मुलांसाठीही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या