कोरोना महामारी अजून संपलेली नाही ; ‘या’ जिल्ह्यांनी वाढवली चिंता

corona

नवी दिल्ली : राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. यामुळे आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली. तर, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यूचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे अनेक कुटुबांचा आधार गेला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट होत आहे.

दरम्यान आज दिलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. दररोज 100 पेक्षा जास्त प्रकरणे असलेल्या जिल्ह्यांमध्येही घट झाली आहे. 1 जून रोजी देशात 279 जिल्हे होते जेथे दररोज 100 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली जात होती, परंतु आता ती संख्या 57 जिल्ह्यांवर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या केवळ 57 जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचे 100 पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद होत आहे. ते म्हणाले की 222 जिल्ह्यांमध्ये प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. केवळ मर्यादित क्षेत्रात प्रकरणे वाढत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, केरळच्या 10 जिल्ह्यांसह 18 जिल्हे आहेत जिथे कोरोनाच्या वाढत्या घटनांचा कल दिसून येत आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये 47.5% प्रकरणे आहेत. ते म्हणाले की, 44 जिल्हे आहेत जेथे पॉझिटिव्ह रेट 10%पेक्षा जास्त आहे. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत. केरळमध्ये 10, महाराष्ट्रात 3 आणि मणिपूरमध्ये 2 जिल्हे आहेत.

लव अग्रवाल म्हणाले की, ‘जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहेत. जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, दुसरी लाट अजून संपलेली नाही. देशात आतापर्यंत ४७.८५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी ३७.२६ कोटी जणांना पहिला डोस मिळाला आहे आणि १०.५९ कोटी जणांना दोन्ही मिळाले आहेत. मे महिन्यात १९.६. लाख डोस आणि जुलैमध्ये ४३.४१ लाख डोस देण्यात आले आहेत. म्हणजेच, मे महिन्यात ज्यांना लसीचा डोस देण्यात आला त्यांच्या तुलनेत ही संख्या जुलैमध्ये दुप्पट आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या