देशात असुरक्षित वाटणाऱ्यांना बाँम्बने उडवेन-भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

टीम महाराष्ट्र देशा : भारतात असुरक्षित वाटतं असं म्हणणारे व्यक्ती देशद्रोही असून त्यांना बॉम्बने उडवलं पाहिजे असंं वादग्रस्त विधान एका भाजप आमदाराने केलं आहे.उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथून विधानसभेवर असणाऱ्या विक्रम सैनी या भाजप आमदाराने हे विधान केले आहे. देशात असुरक्षित वाटणाऱ्यांंनी देश सोडावा नाहीतर मला मंत्रिमंडळात घ्यावंं, अशा लोकांना मी बॉम्ब टाकून उडवतो, तसंंही लष्कराकडे भरपूर दारुगोळा आहे.

सैनी यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ समोर आला आहे.व्हिडिओ मध्ये बोलताना ते म्हणाले,’जो देशद्रोही हैं और कहते हैं कि हमें खतरा है और हम सुरक्षित नहीं हैं, उनका भी कुछ न कुछ इंतजाम होना चाहिए। जो ऐसा बोलें, उनके लिए सजा का प्रावधान हो और यह देशद्रोह की श्रेणी में आए… मुझे अगर सरकार मंत्रालय दे दे, मैं सबको बम लगाकर फोड़ दूंगा।’ उन्होंने यह भी कहा, ‘सेना के पास बहुत बम है, फोड़वा दूंगा।’

You might also like
Comments
Loading...