अजून एका भाजपच्या वाचाळ आमदाराचे वादग्रस्त विधान

नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : मुसलमान भारतात स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी डझनभर मुल जन्माला घालतात असे वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार बनवारीलाल सिंघल यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची श्यक्यता आहे.

बनवारीलाल सिंघल हे राजस्थानच्या अलवार (शहर) मतदारसंघाचे आमदार आहेत. सिंघल यांनी त्यांच्या फेसबुकवर हि वादग्रस्त पोस्ट शेयर केली असून देशातील हिंदुपेक्षा मुसलमान लोक जास्त मुल जन्माला घालतात, असे करून त्यांना देशात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. असे त्यांनी पोस्टमधून म्हटले आहे. सदर पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर सिंघल यांनी माफी मागण्या ऐवजी प्रसारमाध्यमांसमोर वादग्रस्त विधानाला दुजोरा दिला आहे.

अजमेर लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांच्या वादग्रस्त विधानाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सिंघल पुढे म्हणाले, एखाद्या जोडप्याला जास्त मुलांना जन्म देता येणे शक्य नसेल तर मुस्लिम पुरूष दुसरं लग्न करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी मग बिहार आणि पश्चिम बंगालमधून मुली विकत घ्याव्या लागल्या तर मुस्लीम पुरुष ते देखील करतात. अलवारमध्ये अशी अनेक उदाहरणे सापडतील.

You might also like
Comments
Loading...